भिवंडीत रक्तदान शिबिर


 भिवंडी: जायंट्स ग्रुप ऑफ भिवंडी, भिवंडी सहेली और भिवंडी मेट्रो सहेली तर्फे "रक्तदान शिबिराचे" आयोजन रविवार, २० नोव्हेंबर २०२२ रोजी श्री दिगंबर जैन मंदिर, भिवंडी. येथे करण्यात आले होते. जवळपास ८० रक्त दात्यांनी समर्पण ब्लड सेंटरला रक्त दान केले. सदर रक्तदान शिबिराचे उद्घाटन जिवदया जीनसाशन संघ चे ट्रस्टी व उद्योगपती श्री. प्रदीप ताराचंद जैन यांनी केले. सदर प्रसंगी श्री गगन जैन, श्री. जयानंद केणी, दीपक दोड्डी, फरिदा खान, रुचिरा दोंदे, अनुप चॅटर्जी, विनय पुजारी, जिवराज नगारिया, मनिषा भांगरे, डॉ नूर खान, पूनम केणी, शिल्पा मेस्त्री, सोहेल रेशमवाला, रेणू जैन, सोनाली चॅटर्जी, मंदिरा गुप्ता, पिंकी जैन, ममता शेट्टी व ईतर सदस्य उपस्थित होते.